आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पसंती क्रमांक:नवीन दुचाकी वाहनांच्या पसंती क्रमांकासाठी आजपासून दोन दिवस करता येणार अर्ज

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन दुचाकी वाहनांच्या पसंती क्रमांकासाठी १५ नोव्हेंबर पासून पसंती क्रमांक देण्यात येणार आहेत. या पसंती क्रमांकासाठी गुरुवार १० नोव्हेंबर ते शुक्रवार ११ नोव्हेंबर या कालावधीत दुचाकी चालकांना अर्ज करता येणार आहेत. हे अर्ज शहरातील चांदणी चौक येथील उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात सकाळी १० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील.

अशी माहिती अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी बुधवारी दिली. पसंती क्रमांकासाठी दिवसाची चालकांनी विहित शुल्कासह डिमांड ड्राफ्ट खिडकी क्रमांक १४ येथे जमा करावेत. वाहन ज्या व्यक्तीच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, पॅनकार्ड, फोटो आयडी, मोबाईल क्रमांक, ई-मेल जोडावा. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्ज आले तर त्या पसंती क्रमांकाची यादी शुक्रवारी पाच वाजता इमारतीच्या नोटीस फलकावर लावण्यात येईल. असे उर्मिला पवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...