आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यात 51 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्यावतीने फेब्रुवारी २०२३ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील पाचवी व आठवीच्या तब्बल ५१ हजार १४२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्यासाठी जिल्हा परिषदेने स्वनिधीतून ३५ लाखांची तरतूद केली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्व व उच्च प्राथमिक पाचवी व पूर्व माध्यमिक आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन आखले आहे. या परीक्षेत जिल्हा परिषद शाळांमधील सरसकट पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे नियोजन आखले आहे.

मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील तसेच माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात १७ डिसेंबरपर्यंत पाचवीचे ३१ हजार २३२ तर माध्यमिकच्या १९ हजार ९१० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहे.

त्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पाचवीसाठी सुमारे १६ हजार तर आठवीसाठी १ हजार ४०० विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या परीक्षेसाठी मागास / दिव्यांग विद्यार्थ्यांना १२५ तर सर्वसाधारणसाठी २०० रूपये शुल्क आकारण्यात येते. जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्यासाठी ३५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नगर राज्यात पहिल्या तीनमध्ये
पाचवीचे अर्ज दाखल करण्यात राज्यात औरंगाबाद प्रथम, अहमदनगर द्वितीय तर कोल्हापूर तिसऱ्या स्थानी आहे. आठवीसाठी पुणे राज्यात प्रथम, द्वितीय धुळे, अहमदनगर तिसऱ्या स्थानावर आहे.

बातम्या आणखी आहेत...