आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:वीरभद्र सार्वजनिक देवालय ट्रस्टच्या अध्यक्षपदी निधाने

राहाता3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील वीरभद्र (बिरोबा) सार्वजनिक देवालय ट्रस्टच्या अध्यक्षपदी साहेबराव निधाने तर उपाध्यक्षपदी सचिन बोठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. वीरभद्र ( बिरोबा) ट्रस्टच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सोमवारी सकाळी १० वाजता अध्यक्ष सागर सदाफळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या ट्रस्टमध्ये माळी, धनगर, मराठा या ३ समाजातील प्रत्येकी ५ असे एकूण १५ विश्वस्तांची निवड प्रत्येक ५ वर्षांनी करण्यात येते.

मागील विश्वस्त मंडळाची मुदत काही दिवसापूर्वी संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ग्रामसभेच्या माध्यमातून १५ नवीन विश्वासांची निवड करण्यात आली. तसेच सोमवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच खजिनदार यांची निवड प्रक्रिया शांततेत संपन्न झाली. वीरभद्र ट्रस्टच्या अध्यक्षपदी राहाता नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने यांची तर उपाध्यक्षपदी प्रगतिशील शेतकरी सचिन बोठे व खजिनदार पदी ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड या सर्वानुमते निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...