आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:एकनाथराव ढाकणे यांची ग्रामसेवक पतसंस्थेच्या संचालकपदावर वर्णी

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अकोले तालुका मतदार संघातून राज्य ग्रामसेवक युनियनचे माजी राज्याध्यक्ष व संस्थेचे सचिव एकनाथ ढाकणे यांची सलग सातव्यांदा संचालक पदावर वर्णी लागली आहे. अकोले मतदार संघातून एकनाथराव ढाकणे यांचा एकच अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. ढाकणे ग्रामसेवकांच्या प्रश्नावर गेल्या ३२ वर्षांपासून आवाज उठवत आहेत. जिल्हा ग्रामसेवकांची पतसंस्था ३० लाख रुपये प्रति सभासदांना कर्ज देणारी एकमेव पतसंस्था आहे.

रिबेट वाटप, दीपावलीला १५ किलो मोफत साखर, आमसभा घेऊन सभासद पाल्यांचा गुणगौरव, ठेवीवर १० टक्के व्याज आणि सभासदांना १५ टक्के डिव्हिडंट देण्याची उज्वल परंपरा संस्थेने कायम राखली. संस्थेला ऑडिट वर्ग अ आहे. ढाकणे म्हणाले, निवडणुकीच्या ५ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित १४ जागा सुद्धा बिनविरोध कराव्यात, असे आवाहन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख, नफिसखान पठाण, संस्थेचे सचिव प्रदीप कल्याणकर तसेच जिल्हा संघटनेचे प्रतिनिधी, सभासद यांनी ढाकणे यांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...