आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्त्या:बसपाच्या जिल्हा आढावा बैठकीत  पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुजन समाज पार्टीची जिल्हा आढावा बैठक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. पश्‍चिम महाराष्ट्र झोन प्रभारी काळूराम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी प्रदेश कमिटी सदस्यपदी सुनील ओहळ तर जिल्हाध्यक्षपदी उमाशंकर यादव यांची नियुक्ती करण्यात आली. गायरान जमीनीवरील अनुसूचित जाती, जमाती व भटके विमुक्त समाजातील नागरिकांचे अतिक्रमणे हटविण्याच्या निर्णयाविरोधात व नगर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पंचधातूचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी २३ डिसेंबरला विधी मंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर पुकारलेल्या राज्यव्यापी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष संतोष जाधव, शहर प्रभारी संजय डहाणे, सुनिल ओहळ, उमाशंकर यादव, उपाध्यक्ष सिद्धार्थ पाटोळे, सचिव राजू गुजर, राजू भिंगारदिवे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील मगर, जिल्हा प्रभारी बाळासाहेब मधे, दादा जाधव, संतोष वाघ, नितिन जावळे, सलीम आत्तार, राहुल छत्तीसे, महादेव त्रिभुवन, राहुल वाघ, दादा जाधव, संतोष केदार आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...