आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी 12 योजनाना मंजुरी : महादेव जानकर

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने धनगर समाजातील मुलाच्या शिक्षणासाठी विभागनिहाय वसतीगृहासह आदिवासी विभागाच्या धर्तीवर १२ योजनाना मंजुरी दिल्याचा आदेश काढला आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिली.जानकर यांनी नुकतेच निघोज येथील मळगंगा देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते. जानकर म्हणाले, धनगर समाजाला एसटीचे आरक्षणाची अंमल बजावणी व्हावी ही समाजाची मुख्य मागणी आहे. मात्र या मागणीला काही कारणाने उशीर होत असल्याने आम्ही समाजाची प्रगती होण्यासाठी एसटीच्या सवलती लागु करण्यांची मागणी तत्कालिन मुख्यमंत्री देवेद्र फडणविस यांच्याकडे केली होती.

या मागणी साठी भाजपसेना सरकार मधे मी मंत्री असताना धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणा सह आदिवाशी समाजा प्रमाने सोई सुविधा मिळाव्यात म्हणून योजनाचा प्रस्ताव मी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तयार केला होता. मात्र राज्यात सत्तांतर होऊन महाआघाडीचे सरकार आल्याने त्यांनी या प्रस्तावाचा शासन आदेश काढला नाही. राज्यात नव्याने शिंदे फडणवीस सरकार आल्याने त्यांच्याकडे योजनांच्या अंमलबजावणीची मागणी केली. त्यांनी तत्काळ आदेश देत शासन निर्णय काढल्याने त्यांचे आभार जानकर यांनी मानले. उच्च शिक्षणासाठी मुलांच्या वस्तीगृहासाठी मी मंत्री असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जागा प्रत्येक विभागात देण्यात आल्या. प्रत्येक विभाग, त्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावर वस्तीगृह असावेत, अशी समाजाची मागणी होती. त्यानुसार सरकारने बारा योजनांचा शासन आदेश काढला आहे. सर्वांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...