आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्यता:तिळवणी उपबाजार विक्री केंद्रासाठी 38.92 लाख रुपये खर्चास मान्यता

कोपरगाव शहरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या तीळवणी उपबाजार विक्री केंद्र हॉल परिसराचे खडीकरणासाठी १९ लाख ३९ हजार तसेच पुर्वेकडील ग्राउंड यार्ड सोलींगचे १९ लाख ५३ हजार रूपये खर्चाच्या खडीकरण बांधकामास शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव प्रमोद वळंज यांनी नुकतीच मान्यता दिल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

त्या म्हणाल्या की, पूर्व भाग व सभोवतालच्या परिसरातील शेतक-यांनी त्यांचा शेतमाल नजिकच्या केंद्रात विक्री करता यावा यासाठी संजीवनी उद्योग समहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर बिपीनदादा कोल्हे यांनी बाजार समितीस व संबंधीत प्रशासकीय व्यवस्थेस तीळवणी येथे उपबाजार केंद्र सुरू करावे म्हणून सुचना केल्या होत्या. कोपरगांव बाजार समितीने त्याबाबतच्या मंजु-या घेवुन तीळवणी उपबाजार केंद्र सुरू केले त्यासाठी शासन स्तरावर सदर ठिकाणी शेड उभारणी करण्यासाठी २० लाखांचा निधी उपलब्ध करून काम पूर्ण केले. पूर्व भागात तीळवणी येथे उपबाजार केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी बिपीन कोल्हे यांना धन्यवाद दिले होते. बिपीन कोल्हे यांनी तीळवणी उपबाजार विकी केंद्र हॉल सभोवतालचा परिसर खडीकरण आदीबाबतचा प्रस्ताव तयार केला.

बातम्या आणखी आहेत...