आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण:औषध निर्माण कॉलेजला सुविधा केंद्राची मंजुरी ; प्राचार्या पल्लवी फलके यांची माहिती

अकोले24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वीरगाव येथील आनंदगडावरील मातोश्री राधा औषध निर्माता पदवी (फार्मसी) महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्याबाबत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून नव्यानेच सुविधा केंद्राची (एफसी) मान्यता मिळाली असल्याची माहिती या महाविद्यालयाच्या प्राचार्या पल्लवी फलके यांनी दिली.

आंतरभारती रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्यूकेशन ट्रस्ट संचालित मातोश्री राधा फार्मसी (औषध निर्माता) महाविद्यालयातून पदविकासाठी प्रवेश देण्याचे हे शैक्षणिक द्वितीय वर्ष व फार्मसी (औषध निर्माता) महाविद्यालयातून पदवीसाठी प्रवेश देण्याचे पहिलेच वर्ष आहे. सन २०२२-२३ वर्षापासून बी. फार्मसी शिक्षण प्रवेश प्रक्रियेसाठी वीरगावातील आनंदगडावर नव्याने सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून मिळालेल्या मान्यतेनुसार पदविका व पदवी औषध निर्माण महाविद्यालयाचा लाभ तालुक्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना होणार आहे, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी यावेळी स्पष्ट केले.अकोले तालुका व परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना औषध निर्माता शिक्षण पूर्ण करण्यास तालुक्याच्या बाहेरगावी जाऊन अधिक आर्थिक खर्च उचलून घेणे शक्य होत नव्हते.

मात्र आता या केंद्रामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना येथेच दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी या सुविधा केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक सचिव अनिल रहाणे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...