आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजलसंधारण महामंडळाच्या बैठकीत सादर केलेल्या २० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. कर्जत जामखेडमध्ये आमदार पवार यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे मार्गी लागत आहेत. नुकतीच जलसंधारण महामंडळाची वरिष्ठ पातळीवरील उच्चस्तरीय बैठक अहमदनगर येथे पार पडली होती. या महामंडळाच्या बैठकीमध्ये कर्जत व जामखेड तालुक्यातील बंधाऱ्यासंदर्भातील एकूण २६ कामे सुचवण्यात आली होती. त्याचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. यामध्ये कर्जत तालुक्यातील १६ कामे तर जामखेड तालुक्यातील १० कामांचा समावेश होता. बैठकीत झालेल्या चर्चेत दोन्ही तालुक्यातील मिळून जवळपास २० कोटींच्या कामांचे अंदाजपत्रक मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते. त्यास आता शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मतदारसंघात यापूर्वी बंधाऱ्याच्या दुरुस्तीची व देखभालीची विविध कामे करण्यात आली असून बंधाऱ्यातून गळणारे पाणी थांबवण्यासाठी जलसंपदा, जलसंधारण व जि.पच्या माध्यमातून अशी एकूण १५० पेक्षा अधिक कामे मंजूर असून ती कामे देखील प्रगतीपथावर आहेत. मतदारसंघात पाण्याची मोठी अडचण लक्षात घेऊन आणि पूर्वी योग्य सर्वेक्षण न झाल्यामुळे पाण्यासाठी होणारी हेळसांड टाळण्यासाठी आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेतला आणि पूर्वी पेक्षा कामाचा दर्जा देखील सुधारला आहे. आता पार पडलेल्या जलसंधारण महामंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकासही शासनाची मान्यता मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात असतानाच नुकताच शासनाने त्याला हिरवा कंदील दाखवत प्रशासकीय मान्यता दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.