आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील पठार भागाला भेडसावणारा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी येथील चाळीस गावांना वरदान ठरणाऱ्या नांदूर खंदरमाळ येथील मुळा नदीवरील धरणाला शासनाने मंजुरी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाने केली आहे. या संदर्भातील निवेदन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना देण्यात आले आहे.
माजी पाटबंधारे मंत्री स्वर्गीय बी. जे. खताळ पाटील यांनी नांदूर खंदरमाळ येथील मुळा नदीवरील ४ टीएमसी धरणाला १९६८-६९ मध्ये मंजुरी दिली होती. धरणाच्या जागेची पाहणी करून प्रस्ताव देखील शासन दरबारी दाखल केला होता. धरणाला शासकीय पातळीवर मंजुरी मिळाल्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे धरणाचे कामकाज होऊ शकले नाही. मात्र हे धरण नांदुर खंदरमाळ ऐवजी बारागाव नांदुरला करण्यात आले. यामुळे नांदुर खंदरमाळ व पठारातील चाळीस गावचा भाग पाण्यापासून वंचित राहिला. स्थानिक प्रतिनिधींनी धरणासाठी पुढाकार न घेतल्याने आजपर्यंत ४० गावातील लोकांना जनावरांच्या व पिण्याच्या पाण्यासाठी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेती व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने नांदुर खंदरमाळ येथे धरणाचा प्रस्ताव पुर्नजिवीत होऊन धरण बांधणे गरजेचे आहे, असे रासपचे जिल्हाध्यक्ष वनवे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.