आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फार्मसी महाविद्यालय:अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या सुविधा केंद्रास मान्यता

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केडगाव येथील अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या सुविधा केंद्रास महाराष्ट्र शासनाच्या सीईटी सेलने समुपदेशन केंद्र तसेच सुविधा केंद्राचा दर्जा प्रदान करत मान्यता दिली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. राकेश गांधी यांनी दिली. विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाबाबत मार्गदर्शनासाठी या केंद्रांनी योग्य ती प्रक्रिया पार पडणे, कागदपात्रची पडताळणी करण्याबाबत शासनाने विद्यालयांना सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी विविध कॉलेजमध्ये न जात एकाच परिसरामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरळीत करणे हा या केंद्राचा हेतू आहे. बी. फार्म, डी. फार्म व बी. फार्मसी डायरेक्ट दुसरे वर्ष यासाठी हे सुविधा केंद्र आहे, अशी माहिती सुविधा केंद्राचे समन्वयक प्राचार्य डॉ. योगेश सुरेश बाफना यांनी दिली. अरिहंत महाविद्यालयांत बी. फार्म व डी. फार्म हे अभ्यासक्रम सुरु असून हे महाविद्यालय शैक्षणिक, सामाजिक अशा अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. महाविद्यालयांची प्रशस्त इमारत, प्रयोगशाळा, ग्रंथालय, तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, अविरत इंटरनेट सेवा व शैक्षणिक दर्जा या बाबीची तपासणी करण्यात आली होती. त्यात अरिहंत महाविद्यालयात पुर्णपणे त्यांच्या कसोटीत उतरले व सुविधा केंद्रास मान्यता दिली.

बातम्या आणखी आहेत...