आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक:भिंगारचे सेना पदाधिकारी; नगरसेवक शिंदे गटात

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर शिवसेनेचे तीन नगरसेवक शिंदे गटाला सामील झाल्यानंतर आता भिंगारमध्येही शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. सेनेचे भिंगार शहर प्रमुख प्रकाश फुलारी यांच्यासह छावणी मंडळाचे माजी नगरसेवक सुनील लालबोंद्रे, संजय छजलानी आणि रवींद्र लालबोंद्रे यांच्यासह काहीजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत.

यावेळी नगर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, माजी नगरसेवक सचिन जाधव, काका शेळके आदी उपस्थित होते. दिलीप सातपुते व अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे भिंगार शहर प्रमुख प्रकाश फुलारी यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. भिंगार छावणी मंडळात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे मिळून सात नगरसेवक होते. त्यापैकी तीन माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने भिंगार शहरात शिवसेनाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. आजी-माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे नगर शहरात शिंदे गटाची ताकद वाढण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही नगरसेवक व पदाधिकारी आपल्या संपर्कात असल्याचा दावा नगर शहरातील शिंदे गटाकडून केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...