आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्ध कोरोनाविरुद्ध:कोरोनाशी दोन हात करण्यास लष्कराची व्हीआरडीई सज्ज; वैयक्तिक आणि वाहनांच्या निर्जंतुकीकरणासाठी केली विशेष यंत्रणा विकसित

अहमदनगर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
अहमदनगरमधील व्हीआरडीईने विकसित केलेली वाहनांसाठीची सॅनिटायझर यंत्रणा. - Divya Marathi
अहमदनगरमधील व्हीआरडीईने विकसित केलेली वाहनांसाठीची सॅनिटायझर यंत्रणा.
  • पन्नास खाटांचा कक्ष ७ दिवसांतच तयार, लष्करासह सर्वांनाच लाभ

भूषण देशमुख

युद्धभूमीवरील लष्करी वाहनांचे संशोधन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या नगरच्या व्हेइकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने (व्हीआरडीई) कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ यावे म्हणून नागरिक आणि वाहनांसाठी निर्जंतुकीकरणाची विशिष्ट प्रकारची यंत्रणा विकसित केली आहे. हे संशोधन केवळ लष्करासाठी नसून मानवजातीला त्याचा उपयोग व्हावा, अशी आमची इच्छा असल्याचे व्हीआरडीईचे संचालक संगम सिन्हा यांनी सांगितले. अवघ्या १० सेकंदांत एक वाहन किंवा व्यक्ती सॅनिटाइझ केली जाऊ शकते. लष्कराच्या डीडीआर अँड डीचे सचिव डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी नगरच्या व्हीआरडीईला प्रतिबंधात्मक यंत्रणा विकसित करण्यास सांगितल्यावर अवघ्या चार तासांतच व्हीआरडीईने पर्सनल सॅनिटायझरचे पहिले मॉडेल तयार केले. दुचाकी आणि हलकी वाहने सॅनिटाइझ करण्यासाठी विशेष प्रकारचे कक्ष व तंबू व्हीआरडीईने आठवडाभरातच तयार केले. ही यंत्रणा कर्नल अनुज सिंग लुथ्रा यांच्या नेतृत्वाखाली युद्धपातळीवर तयार केली गेली.

असे करते काम : विद्युत मोटारीचा वापर करून मारला जातो फवारा

  • वैयक्तिक सॅनिटायझरमध्ये विद्युत मोटारीवर चालणारा शक्तिशाली फवारा आहे. तळाशी टाकीतील अौषध सूक्ष्म कणांच्या स्वरूपात फवारले जाते. वाहन आत आले की या नोझल्समधून अौषधाचा सूक्ष्म फवारा सुरू होतो.
  • विलगीकरणासाठी व्हीआरडीईने राष्ट्रीय वाहन चाचणी केंद्राच्या शेवटच्या टोकाला पन्नास खाटांचा सुसज्ज क्वॉरंटाइन कक्ष तयार.
  • ही यंत्रणा नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यान्वित झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...