आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई:सव्वा लाखाची सुगंधी तंबाखू पकडली

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत सव्वा लाखाची सुगंधी तंबाखू व मिक्सप मशिन असा १ लाख ६० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई दिल्लीगेट परिसरातील मानकर गल्ली येथे करण्यात आली. पथकाने एकास ताब्यात घेतले.

अभिषेक भिंगारदिवे (रा. दातरंगे मळा) हा मानकर गल्ली येथील एका खोलीत सुगंधी तंबाखु, मावा तयार करून विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेवरून सहाय्यक निरीक्षक दिनकर मुंढे, सुनील चव्हाण, संदीप पवार, रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, कमलेश पाथरूट, योगेश सातपुते, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...