आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविजेचा कडकडाट करत शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. या मृग नक्षत्रातील पावसामुळे राहुरीतील शेतकऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. अर्ध्या तासानंतर पावसाच्या सरी मंदावल्या. ७ जूनला मृग नक्षत्रास सुरवात झाली. मात्र ४ दिवसाचा कालावधी उलटून देखील राहुरी भागात पावसाचे आगमन नसल्याने शेतक-यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.शुक्रवारी सकाळ पासुनच वातावरणातील बदल पाहता पावसाचे अंदाज वर्तविण्यात येत होते.सायंकाळी ४ वाजता वादळी वा-यासह राहुरीत पावसाचे आगमन झाले.पहिल्या पावसाचे पाणी राहुरी शहराच्या बाजार पेठेतील काही दुकानात शिरल्याने व्यावसायीकांची चांगलीच धावपळ उडाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.