आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

800 कलावंत झीजवताहेत जि. प.चे उंबरठे:कलावंतांना दरमहा मानधन योजना, दरवर्षी 100 जणांनाच मानधन; 3 वर्षांत तीनशेच लाभार्थी

अहमदनगर I दीपक कांबळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार ज्येष्ठ कलावंतांना दरमहा मानधन देण्याची योजना राबवली जाते. अहमदनगर जिल्ह्याला दरवर्षी केवळ 100 कलावंतांनाच मानधन सुरू करण्याची मर्यादा (इष्टांक) घातली. त्यामुळे जिल्ह्यात आजही 800 कलावंत जिल्हा परिषदेचे उंबरठे झीजवत असून त्यांना लाभ मिळालेला नाही.

पन्नास वर्षापेक्षा अधिक वय असलेला कलावंत अथवा साहित्यिक, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 48000, कला साहित्य क्षेत्रात पंधरा ते वीस कामगिरी करणाऱ्या वृद्ध साहित्यिक अथवा कलावंतास दरमहा मानधन दिले जाते. जर कलावंत राष्ट्रीय असेल तर दरमहा 3 हजार 150, राज्यस्तरीय कलावंतासाठी 2 हजार 700 तसेच स्थानिक कलावंत असेल तर 2 हजार 250 रुपये मानधन दिले जाते.

तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जुलै 2021 मध्ये या योजनेच्या कलावंताच्या निवडीसाठी समिती गठित केली होती. प्रकाश जंजिरे या समितीचे अध्यक्ष असून वर्षात एकदाच या समितीची बैठक होते.

या योजनेसाठी दरवर्षी 700 ते 800 प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे दाखल होतात. जिल्ह्यासाठी केवळ शंभर कलावंतांचीच निवड एका वर्षात करता येते. त्यामुळे अनेक जण पात्र असूनही त्यांना पुढील वर्षीच्या प्रतीक्षा यादीत टाकले जाते.

वर्षनिहाय दाखल प्रस्ताव व निवड

2020 मध्ये 582 कलावंतांनी मानधनासाठी प्रस्ताव दिले होते त्यापैकी शंभर कलावंतांची निवड झाली. 2021-2022 मध्ये 927 प्रस्ताव असताना इष्टांक मर्यादेच्या अटीमुळे केवळ शंभर प्रस्ताव मंजूर झाले. स्थितीत सुमारे 800 कलावंत प्रतिक्षा यादीत आहेत.

2018 पासून यांनी झिजवले उंबरठे

जिल्हा परिषदेत मानधनासाठी नगर तालुक्यातील मेहेकरी येथील महादेव पालवे हे कलावंत 2018 पासून हेलपाटे मारत आहेत. त्यांचा अर्ज एक ऑक्टोबर 2018 चा असून त्यावर दिवंगत खासदार दिलीप गांधी यांचे शिफारस पत्र देखील आहे. तथापि, मानधन मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...