आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:बातमी जेवढी महत्त्वाची, तेवढेच छायाचित्र बोलके ठरते : सातपुते

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या संगणकीय युगात टिव्ही चॅनल, सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील घटना आपल्याला लगेचच समजत असल्या तरी प्रिंट मीडियाने आपला जनमानसातील विश्वास कायम टिकवून ठेवला आहे. या क्षेत्रात पत्रकारांबरोबरच छायाचित्रकारांनाही तेवढेच महत्वाचे स्थान आहे. वृत्तपत्रात बातमी जेवढी महत्वाची, तेवढेच छायाचित्र बोलके ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते यांनी केले.

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त येथील रेणुकामाता मल्टीस्टेटच्या वतीने नगर शहरातील वृत्त छायाचित्रकारांचा ज्येष्ठ पत्रकार सातपुते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रेणुकामाता मल्टीस्टेटच्या आडतेबाजार शाखा कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे शाखा व्यवस्थापक दत्तात्रय अंकम यांनी प्रास्ताविकात रेणुकामाता मल्टीस्टेटच्या प्रगतीची माहिती देताना नगर शहरातील वृत्त छायाचित्रकारांच्या कार्याचा गौरव केला. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भालेराव यांच्या नेतृत्वाखाली रेणुकामाता मल्टीस्टेट ग्राहकांसाठी अत्याधुनिक सेवा देतानाच संस्था प्रगती करीत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल शाह, दत्ता इंगळे, समीर मन्यार, विक्रम बनकर, राजू खरपुडे, लहू दळवी, सुरेश मैड, विजय मते, श्रीकांत वंगारी, सुरेश भुसा, प्रसाद शिंदे, यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सचिन राठोड यांनी, तर आभार शैलेश धबडगे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी प्रिया कसबे, सतीश aउरणकर, अनिता कोहोक, मुनीर शेख, सचिन पवार आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...