आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यभरात मुंबईसह इतर जिल्ह्यात गोवरचा प्रसार होत असून रूग्णांची संख्या वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यात आरोग्य विभागाने आतापर्यंत तब्बल १५८ संशयीत रूग्णांचे नमुणे मुंबई येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहे. त्यापैकी ९ रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. गोवरचा धोका लक्षात घेऊन जिल्हाभरात लसीकरणाला गती देण्यात आली आहे.
राज्यात प्रथम मुंबईत गोवरचे रूग्ण आढळून आले होते, गोवर निर्मुलनासाठी पथकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.ताप व अंगावर पुरळ आले असेल तर सरसकट रक्त नमुणे तपासणीसाठी पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नगर शहरातून २४ नमुने पाठवले असून माळीवाडा आरोग्य केंद्रात घेतलेले ३ संशयीत नमुन्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. तर जिल्हा परिषदेने घेतलेल्या १३४ नमुण्यांपैकी सुमारे ९ नमुण्यांचा अहवाल प्रलंबित आहे. प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत एकही रूग्ण पॉझिटिव्ह नाही.
ऑक्टोबर महिन्याअखेर ६० टक्के लसीकरण गोवर रूबेला ऑक्टोबर अखेर ५८ % लसीकरण होणे अपेक्षित होते. परंतु जिल्ह्यात आपण ६० टक्के पूर्ण केले आहे. या बालकांचे लसीकरण बाकी आहे. त्यांचे तातडीने लसीकरण करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.'' डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
गोवर रुबेला लस कोणाला द्यावी? बाळाला नऊ महिन्याला गोवरची लस दिली जाते, त्यानंतर १६ ते २४ महिन्यांत दुसरा डोस दिला जातो. जर रूग्ण आढळून आला, तर त्या परिसराचे सर्वेक्षण करून सरसकट ९ महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकाला एक अतिरिक्त डोस दिला जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
ही लक्षणे आढळल्यास नमुने तपासणीसाठी घेतात ताप येणे तसेच अंगावर पुरळ आले तरी संबंधित रूग्णाचे रक्त नमुणे तपासणीसाठी घेतले जातात. जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातून एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत १३४ नमुणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. आतापर्यंत एकही रूग्ण पॉझिटिव्ह नसल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.