आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवारपासून येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पोलिस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी घेण्यात आली. पहिल्या दिवशी एक हजार उमेदवारांना चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. प्रत्यक्षात ६०४ उमेदवारांनीही चाचणीसाठी हजेरी लावली. त्यातील ८३ जणांना बाद ठरविण्यात आले. उर्वरित ५२१ जणांनी चाचणी दिली असून, पहिल्याच दिवशी मैदानी चाचणीसाठी ३९६ उमेदवारांनी दांडी मारल्याचे समोर आले.
पोलिस भरतीच्या नगर जिल्ह्यातील १३९ जागांसाठी १२ हजार ३३४ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी २ जानेवारीपासून सुरू झाली आहे. दोन दिवस पोलिस चालक पदासाठी मैदानी चाचणी घेण्यात आली. बुधवारी पहाटेपासून शिपाई पदाच्या १२९ जागांसाठी चाचणीला सुरूवात झाली. प्रत्येक दिवशी एक हजार मुलांना चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे. १६०० मीटर धावण्यासाठी अरणगाव शिवारात व्यवस्था करण्यात आली आहे. येथील मैदानावरून अरणगाव येथे जाण्यासाठी पोलिस व्हॅन ठेवण्यात आल्या आहे.
स्वत: पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक (गृह) कमलाकर जाधव, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, अंमलदार यांचा बंदोबस्त चाचणीसाठी तैनात करण्यात आला आहे. मैदानी चाचणीसाठी येणाऱ्या मुलांमुळे मुख्यालय परिसर गजबजला आहे. पहाटे पाचपासून उमेदवारांना मैदानात प्रवेश दिला जातो. तेथे त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. यानंतर छाती आणि उंचीचे मोजमाप केले जाते. यानंतर पात्र उमेदवारांची चाचणी घेण्यात येते. गोळा फेक, १०० मीटर धावणे झाल्यानंतर १६०० मीटर धावण्यासाठी अरणगाव शिवारात नेले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.