आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीगोंदे तालुक्यातील कुकडीच्या लाभ क्षेत्रातील बारा गावातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर झाल्याने नियमानुसार १३२ चारीला कुकडीचे पाणी मिळण्यासाठी ५ एप्रिल रोजी सर्व शेतकरी यांना बरोबर घेऊन गेट तोडो आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्रतिभा बबनराव पाचपुते यांनी दिल्यानंतर मंगळवारी पाचपुते सर्व कार्यकर्त्यांसह गेटवर पोहोचण्याच्या अगोदरच १३२ चारीचा विसर्ग १०० क्युसेक्स चालू केला गेला. तो २२५ क्युसेक्स पर्यंत वाढवण्याच्या सूचना पाचपुते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
त्यानंतर मंगळवारी त्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महाराष्ट्र राज्य, तसेच कुकडी पाटबंधारे विभाग्र क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळणे गरजेचे आहे. लाभक्षेत्रात पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. उभी पिके जळून जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाणी सोडण्याबाबत संबंधित अधिकारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर भेदभाव होत आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. समस्त शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. श्रीगोंदे तालुक्यातील सर्व वितरिकांना पूर्ण दाबाने पाणी सोडणेबाबत संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, असे न झाल्यास श्रीगोंदे तालुका भाजपा सर्व पदाधिकारी व लाभधारक शेतकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन करणार असून याची पूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहिले, असा इशारा निवेदनाद्वारे डॉ. प्रतिभा पाचपुते यांनी दिला. यावेळी कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी पाचपुते यांना आश्वासन दिले की, १३२ चारी बंद होणार नाही तसेच १० एप्रिल नंतर श्रीगोंदे तालुक्यातील सर्व वितरिकांना पूर्ण दाबाने पाणी सोडण्यात येईल. यावेळी डॉ. प्रतिभा पाचपुते, गणपतराव काकडे, संदीप नागवडे, बापूतात्या गोरे, संग्राम घोडके, राजेंद्र उकांडे, अशोक खेंडके, शहाजी खेतमाळीस, सुनील वाळके, रमेश लाढाणे, अंबादास औटी, संतोष क्षीरसागर, सुधीर खेडकर, संजय खेतमाळीस, महेश लांडे, महावीर पटवा, उमेश बोरुडे, अरुण वाळके, अमोल अनभुले, महेश क्षीरसागर आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.