आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:गर्भवती प्रेमिकेकडून लग्नाची मागणी होताच ‘त्या’ युवकाने काढला पळ, राहुरी तालुक्यातील ब्राम्हणीच्या युवकाविरुद्ध अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या युवक-युवतीचे प्रेमसंबंध जुळले. त्यांच्यात शारिरीक संबंध आल्याने युवती गर्भवती राहिली. युवतीने त्या युवकासोबत लग्न करण्याची मागणी केली असता त्याने फोन बंद केला. या प्रकरणी नगर तालुक्यातील पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी तालुक्यातील ब्राम्हणीच्या युवकाविरुद्ध अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

ऑगस्ट आणि ऑक्टोबर २०२१ मध्ये नगर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. अल्पवयीन युवतीची राहुरी तालुक्यातील ब्राम्हणीच्या युवकासोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यांच्यात फोनवर बोलणे होऊन दोघांची मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. युवकाने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. युवती गर्भवती राहिली. तिने त्याच्याकडे लग्न करण्याची मागणी केली. युवकाने लग्न करण्यास टाळाटाळ केली. युवतीने त्याच्यासोबत फोनवर संपर्क केला, मात्र त्याचा फोन लागला नाही. हा प्रकार युवतीच्या घरच्यांना माहिती झाला. पीडित युवतीने ५ एप्रिल रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात युवकाविरुद्ध फिर्याद दिली.

बातम्या आणखी आहेत...