आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:घंटागाडी येत नसल्याने काँग्रेस अाज‎ ठाेकणार मनपाच्या नावाने बोंब‎‎

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन आठवड्यांपासून शहराच्या‎ विविध भागात कचरा संकलनासाठी‎ मनपाची घंटागाडी येत नाही.‎ मनपाच्या कोलमडलेल्या यंत्रणेच्या‎ निषेधार्थ नागरिकांनी सोमवारी (६‎ मार्च) कच्ची होळी करावी.‎ काँग्रेसच्यावतीने सोमवारी सायंकाळी‎ कच्ची होळी करून मनपाच्या नावाने‎ बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल,‎ असे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष‎ किरण काळे यांनी केली.‎

काळे म्हणाले, ऐन सणासुदीच्या‎ दिवशी नागरिकांच्या घरात कचऱ्यांचे‎ ढीग लागले आहेत. घंटागाडीत‎ मागील दोन आठवड्यांपासून दारात‎ आलेली नाही. इच्छा नसतानाही‎ नागरिकांना रात्रीच्या वेळी नाईलाज‎ रस्त्यांवर कचरा टाकावा लागत आहे.‎ यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा‎ प्रश्न निर्माण झाला आहे.‎ कचऱ्याचा ठेका १५ फेब्रुवारीपासून‎ गुजरातच्या एका कंपनीला देण्यात‎ आला. मनपाच्या ढिसाळ‎ कारभाराबाबत सायंकाळी काँग्रेस‎ शहरात कच्ची होळी करणार असून‎ मनपाच्या नावाने बोंबाबोंब‎ आंदोलन करणार असल्याचे काळे‎ यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...