आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल फ्लूच्या रुग्णांत वाढ:वातावरण बदलताच जिल्ह्यात वाढले संसर्गजन्य आजाराचे रुग्ण

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठ दिवसापासून वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे व्हायरल फ्लूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. नगरच्या जिल्हा रुग्णालयात गुरुवारी दिवसभरात ४९०० रुग्ण तपासणीसाठी व उपचारासाठी आले होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात केस पेपर काढण्यासाठी रुग्ण व नातेवाईकांच्या रांगा लागलेल्या होत्या.

दिवाळीपासून थंडीत वाढ होऊ लागली आहे. तत्पूर्वी झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी गटारी मध्ये पाणी साचल्याने साथीच्या आजाराच्या रुग्णात वाढ झाली असतानाच थंडी वाढल्यानंतर झालेल्या वातावरण बदलाचा परिणाम दिसू लागला आहे. सरकारी व खाजगी रुग्णालयामध्ये तपासणी व उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये गेल्या पाच दिवसापासून वाढ होताना दिसत आहे. सर्दी, ताप, खोकला व डेंगू चे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर स्वाइन फ्लूचे देखील रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण तपासणी कक्ष रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी फूल्ल भरलेला दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...