आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विर्सग:पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याचा विर्सग झाला कमी

नगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जाेर काही प्रमाणात आेसरल्याने धरणांतून नदी पात्रांमध्ये साेडण्यात येणारा पाण्याचा विर्सग कमी झाला आहे. नगर जिल्ह्यात गेल्या महिन्यात ५ जूलैपासून पावसाला सुरुवात झाली हाेती. जून महिना मात्र काेरडा गेल्याने चिंता वाढली हाेती. जूलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा, निळवंडे, नांदूरमध्यमेश्वर या धरणांतून नदी पात्रांत पाण्याचा विर्सग सुरु हाेता.

मात्र गेल्या चार दिवसांपासून पाऊस थांबल्यामुळे विर्सग कमी झाला आहे.मंगळवारी सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात केवळ ८२६ क्यूसेक तर निळवंडे, ओझर बंधारा यातून विर्सग बंद केला आहेनांदूरमध्यमेश्वर धरणातून केवळ ८०७ क्यूसेकने विर्सग सुरु आहे. पंधरा दिवसांपुर्वी या धरणांतून दरराेज २ ते १५ हजार क्यूसेकने विर्सग सुरु हाेता.

बातम्या आणखी आहेत...