आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:रस्ता नसल्याने माजी सैनिकाला घरी जाण्यासाठी हवे हेलिकॉप्टर

शेवगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सालवडगाव येथे वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने घरी जाण्यासाठी हेलिकॉप्टर खरेदी करायचे आहे. त्यासाठी सरकारी अनुदान द्यावे, अशी मागणी सेवानिवृत्त माजी सैनिक भापकर यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

सेवानिवृत्त झाल्यानंतर आपले सेवानिवृत्तीचे नंतरचे जीवन हे आनंदाने सुखा समाधानाने जावे, असे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांची इच्छा असते. परंतु शेवगाव तालुक्यातील सेवानिवृत्त जवान दत्तू भापकर यांना मात्र वेगळा अनुभव आला आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपले गाव सालवडगाव येथे आपला पुढील उदरनिर्वाह करण्याचे ठरवले. ते सालवडगाव येथील हनुमान वस्तीवर राहतात. या वस्तीवर येण्या जाण्यासाठी रस्ताच नाही.

आजारी असले तरी वेळेवर वैद्यकीय सुविधाही मिळत नाहीत. या वस्तीवर स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे होऊनही रस्ता नसल्याने त्यांनी अनेक वेळा सरकारी दरबारी यासंदर्भात पाठपुरावा केला. परंतु त्यांना सरकारी दरबारी न्याय मिळालाच नाही. शेवटी त्यांनी वैतागून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मला रस्ता नसल्याकारणाने अनुदानित हेलिकॉप्टर घ्यायचे आहे. यासाठी मला मुख्यमंत्री यांनी सरकारी अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...