आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्वाही:आशा सेविकांच्या पाठीशी भाऊ म्हणून उभा राहील : आमदार कानडे

श्रीरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशा सेविका व महिला बचत गटाना कोणतीही प्रशासकीय अडचण आल्यास एक भाऊ म्हणून मी सदैव तुमचे बरोबर असेल, अशी ग्वाही आमदार लहू कानडे यांनी दिली.

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील आशा सेविका व महिला बचत गटाच्या प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी व त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याकरिता बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजश्री देशमुख, समूह संघटक जगताप, जिल्हा औद्योगिक केंद्राचे निरीक्षक अशोक बेनके, गट विकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस आदी उपस्थित होते. आमदार कानडे यांनी आशा सेविका व महिला बचत गटाच्या प्रतिनिधी समस्या जाणून घेतल्या. आशा सेविका व महिला बचत गटांनी त्यांच्या अडचणीचा पाढा मांडला. वेगवेगळ्या बँकाकडून बचत गटांना कर्ज मिळण्याकरता येणाऱ्या अडचणी तसेच अनेक गरीब महिलांना बचत गटात येण्याची इच्छा असूनही बीपीएल कार्ड नसल्याने येणाऱ्या अडचणी तसेच आशा सेविकांना जिल्हा परिषदे मार्फत अनेक ठिकाणी काम करण्यात सांगितले जाते.परंतु एक रुपया सुद्धा मानधन मिळत नाही, असे सांगितले. आमदार कानडे लवकरच बँक राष्ट्रीयकृत बँक व इतर बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.तसेच देशातील काही गारमेंट्स कंपनीबरोबर करार करून सुमारे पाचशे महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षण व प्रशिक्षण संपल्यावर प्रत्येकिला एक शिलाई मशीन देण्याचे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...