आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअशोक सहकारी साखर कारखान्याची सन २०२१-२२ च्या गळीत हंगामात स्वतःचे ८ लाख ५२ हजार ७९२ टन, तर बाहेरच्या कारखान्यांना पुरविलेला २ लाख १३ हजार ६१६ टन असे एकूण १० लाख ६६ हजार ४०८ टन इतके उच्चांकी ऊस गाळप करुन कारखाना वाटचालीत आव्हानात्मक ठरलेल्या यंदाच्या गळीत हंगामाची निर्विघ्नपणे सांगता झाल्याचे प्रतिपादन चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले. अशोक कारखान्याच्या सन २०२१-२२ च्या गाळीत हंगामाची सोमवारी कारखान्याचे संचालक रामभाऊ कासार व त्यांची पत्नी सविता कासार यांचे हस्ते गव्हाणीत शेवटची उसाची मुळी टाकून सांगता झाली. याप्रसंगी साखर कामगार सभेचे सरचिटणीस अविनाश आपटे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब उंडे, ज्येष्ठ संचालक कोंडीराम उंडे, हिम्मतराव धुमाळ, बाबासाहेब आदिक, मंजुश्री मुरकुटे, शितल गवारे, अमोल कोकणे, योगेश विटनोर, प्रफुल्ल दांगट, विरेश गलांडे, पुंजाहरी शिंदे, यशवंत बनकर, ज्ञानेश्वर काळे, अच्युत बडाख, अशोक पारखे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, अमर ढोकचौळे, हरिदास वेताळ, शिवाजी मुठे, सचिन काळे, भगवान सोनवणे, संजय लबडे, कचरु औताडे, शनैश्वर पवार, नारायण बडाख, रावसाहेब माने, दशरथ पिसे, सुभाष पटारे, चंद्रभान पवार आदी उपस्थित होते. यंदा कारखाना कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस उपलब्ध होता. त्यामुळे कार्यक्षेञातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याचे आव्हान होते. अशा स्थितीत व्यवस्थापनाने ऊस तोडणीचे नियोजन केले. संपूर्ण ऊसाची तोडणी व्हावी यासाठी तब्बल ५० हार्वेस्टरची उपलब्धता करण्यात आली. तसेच कारखाना दैननंदिन गाळपाव्यतिरिक्त प्रवरा, राहुरी, गणेश, प्रसाद, संगमनेर, ज्ञानेश्वर, मुळा आदी कारखान्यांना ऊस पुरवठा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सन २०२१-२२ च्या गळित हंगामात कारखान्याने स्वतःचे ८ लाख ५२ हजार ७९२ टन, तर बाहेरच्या कारखान्यांद्वारे २ लाख १३ हजार ६१६ टन असे एकूण १० लाख ६६ हजार ४०८ टन उसाचे विक्रमी गाळप केले. कारखान्याने कार्यक्षेत्राबाहेरील नियमित ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादकांच्या ७८ हजार टन ऊस खरेदी करून गाळप केले. सदरचे शेतकरी कार्यक्षेत्रात ऊस टंचाई असते, तेव्हा ऊस पुरवठा करतात. त्यांना वाऱ्यावर सोडणे इष्ट ठरत नाही. त्यामुळेच त्यांच्या उसाचे गाळप करण्याचा निर्णय व्यवस्थापनने घेतला. कारखाना वाटचालितील सर्वात आव्हानात्मक ठरलेला गळीत हंगाम यशस्वीतेसाठी कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी कंत्राटदार, तोडणी मजूर, हार्वेस्टर मालक यांच्यामुळे हंगाम यशस्वी झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.