आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अष्टविनायक अहमदनगरचे':इको फ्रेंडली बांबू हाऊसमध्ये पर्यावरणपूरक धार्मिक देखावा, आठ पैकी सात गणेश उजव्या सोंडेचे

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाविन्यपर्ण उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील असणारे शिक्षक सतिश गुगळे यांनी आपल्या इको फ्रेंडली बांबू हाऊसमध्ये पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून अष्टविनायक देखावा साकारला आहे.

गुगळे म्हणाले, सुमारे 100 ते 400 वर्षांपूर्वीच्या काळातील हे नगर मधील बहुतांश स्वयंभू गणेशमूर्ती आहेत. महाराष्ट्रातील अष्टविनायक मध्ये फक्त एकच उजव्या सोंडेचा सिद्धटेकचा सिद्धिविनायक आहे. परंतू आपल्या अहमदनगरच्या अष्टविनायकमध्ये आठ पैकी सात गणेश उजव्या सोंडेचे आहेत. फक्त वाळके वाड्यातील एकच गणपती डाव्या सोंडेचा आहे.

26 महिने काम

शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती ही नावाप्रमाणेच सुमारे 11 फूट उंच आहे. दोन्ही हाताने आशीर्वाद देणारी ही दुर्मिळ मूर्ती आहे. शिवाय या मूळ मूर्तीवरील सुमारे 26 महिने काम करून दोन टन शेंदूर काढल्याने आपण सुंदर अशी मूळ विशाल गणपतीची पौराणिक मूर्ती पाहू शकतो.

शनि गल्लीतील अक्षता गणपतीची मूर्ती जेथे आहे तिथे पुरातन काळात मोठे जंगल असल्याचे सांगितले जाते, शिवाय नगरवासियांच्या घरी असणाऱ्या कोणत्याही मंगल कार्याची पहिली पत्रिका या गणपतीला अर्पण करण्याची परंपरा आहे.

350 ते 400 वर्षे जुनी मूर्ती

दिल्लीगेट वेशीच्या आतमध्ये असणर्या शमी गणपतीची स्थापना मूळ शमी वृक्षाच्या मुळीपासून या गणेशाचा आकार तयार झाल्याचे सांगण्यात येते. विक्रांत चौकातील देशमुख गल्लीतील मुळे वाड्यातील सिद्धिविनायकची मूर्ती 350 ते 400 वर्षांपूर्वीची असल्याचे येथील दागिन्यातील घडणावळीवरून समजते. या स्वयंभू मूर्तीला प्रदक्षिणा घातलेली चालत नाही.

आकर्षक स्वयंभू मूर्ती

सरदार मिरीकर वाड्यातील उत्तराभिमुख गणेशाची मूर्ती अद्भुत आहे. 5 ते 6 पायऱ्या खाली उतरून या गणेशाचे जवळून दर्शन घेता येते. तांगे गल्लीतील वाळके वाड्यातील पावन गणपती एकमेव अशी डाव्या सोंडेची नवसाला पावणारी गणेश मूर्ती. सुमारे 5.5 फूट उंचीची ही आकर्षक स्वयंभू मूर्ती आहे.

शांतीचे प्रतिक अष्टविनायक

अर्बन बँक रोडवर पूर्वीच्या वाडेकर वाड्यातील सिद्धिविनायकाची पुरातन मुर्ती पाहून मन प्रसन्न होते. 2 बाय 4 आकारातील गाभाऱ्यात ही मूर्ती असून नागाचे जानवे धारण केलेले आहे. खाकीदास बाबा मठात असणारी वरदविनायकाची मूर्तीच्या हातात एकही आयुध नाही व चारही हात प्रगतीसाठी आशीर्वाद देणारे व शांतीचे प्रतिक म्हणून नगरच्या अष्टविनायकांपैकी एक आहे.

मूळ संकल्पना

आपणही सहकुटुंब सहपरिवार एकदा नगरच्या अष्टविनायकांच्या दर्शनाचा लाभ घेऊन नगरच्या ऐतिहासिक-धार्मिक नावलौकिकात भर घालावी, हीच या देखाव्या मागील मूळ संकल्पना आहे, असे गुगळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...