आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साजन शुगर कारखान्याच्या विसाव्या गाळप हंगामाला प्रारंभ:आमदार पाचपुते यांचे प्रतिपादन

श्रीगांेदेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी व देवदैठण परिसरातील लोकांच्या सहकार्याने साईकृपा कारखान्याची निर्मिती झाली. त्यांचा त्याग विसरून चालणार नाही. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न स्व. आण्णांनी केला. येथून पुढेही तो सर्वांनी करावा व तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी सभादसादांना न्याय देण्याचे काम कारावे, अशी आशा साईकृपा कारखान्याचे संस्थापक तथा राज्याचे माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते यांनी केली.

साजन शुगर कारखान्याचा २० वा गळीत हंगाम शुभारंभ आमदार पाचपुते यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमानंतर पत्रकार परिषेदेत बोलताना साजन शुगर कारखान्याचे चेअरमन साजन पाचपुते म्हणाले, स्व. सदाशिव आण्णा पाचपुते यांच्या आशीर्वादाने साखर कारखानदारीतील कोणताही अनुभव नसताना व आर्थिक अडचण असताना मागील गाळप हंगाम यशस्वी केला. उद्याचाही गाळप हंगाम सर्व शेतकरी ऊस उत्पादक, कामगार यांचे सहकार्याने यशस्वी करून दाखवू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शेतकरी जितेंद्र लोखंडे, जितेंद्र घेगडे, सतीश काळाणे, शिवाजी साळवे, धनंजय ओव्हळ यांच्या हस्ते सपत्निक गव्हाणीची विधीवत पूजा करण्यात आली. कार्यक्रमास संचालक दत्तात्रय (नाना) पाचपुते, साई उद्योग समूहाच्या संचालिका सुनंदा पाचपुते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनुकाका पंधरकर, पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र पाचपुते, अमोल पवार, काष्टी ग्रामपंचायतीचे उपसरपंच पप्पूशेठ दागंट, माजी उपसरपंच संदीप (महाराज) पाचपुते, राजापूरचे माजी उपसरपंच सचिनराव चौधरी, मढेवडगावचे माजी उपसरपंच प्रकाश उंडे, नारायण टिमुणे, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, तोडणी वाहतूक कंत्राटदार, कारखाना अधिकारी, कामगार आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक जनरल मॅनेजर आर. व्ही. काळे यांनी केले. सूत्रसंचालन जन अधिकारी एस. एन. गुंड यांनी केले.

उसाला प्रतिटन २४०० रुपये पहिला हप्ता देणार साजन शुगर साखर कारखान्याच्या यंदाच्या २०२२-२३ च्या गाळप हंगामात येणाऱ्या ऊसास प्रतिटन २४०० रुपये पहिला हप्ता काटा पेमेंट देणार आहे. गाळप हंगाम २०२१-२२ च्या आलेल्या ऊसास प्रति टन दुसरा हप्ता ५० रुपयांप्रमाणे लवकरच शेतकऱ्यांच्या सोईनुसार दिलेल्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तोडणी, ३० टक्के कमिशन, वाहतूक ३० टक्के कमिशनसह रोख पेमेंट दिले जाईल, असेही कारखान्याचे अध्यक्ष साजन पाचपुते यांनी यावेळी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...