आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक साक्षरता अभियान:प्रांताधिकारी अनिल पवार यांचे प्रतिपादन, भावी मतदारांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया

श्रीरामपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावी मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी, जागरूकता वाढावी यासाठी निवडणुक आयोगाचा ‘स्वीप’ साक्षरता अभियान हा पथदर्शी उपक्रम अाहे. त्या अंतर्गत तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयामध्ये मतदार साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे.

बेलापूर शिक्षण संस्थेच्या जेटीएस कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधित्वासाठी निवडणुक आयोगच्या स्वीप’ निवडणूक साक्षरता अभियान उपक्रमांतर्गत मतदान प्रक्रिया स्वीप’ निवडणूक साक्षरता अभियानाचे आली. त्याचा शुभारंभ करताना बोलत होते.यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील,सचिव ऍड शरद सोमाणी,विश्वस्त बापूसाहेब पुजारी,राजेश खटोड, रवी खटोड, भरत साळुंखे, विजय साळुंके स्वीप समन्वयक शकील बागवान,निवडणूक शाखा सहाय्यक संदीप पाळंदे,प्राचार्य श्रीराम कुंभार,उपप्राचार्य सुनीता ग्रोव्हर, पोलिस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, गणेश भिंगारदे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व गुण विकसित व्हावे व भावी मतदारांना निवडणूक प्रक्रिया समजावी या हेतूने उमेदवारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत, अर्ज मागे घेण्याची मुदत, प्रचाराचा वेळ व संधी, निवडणुकीचे महत्त्व, भविष्यातील निवडणुकीत विद्यार्थ्यांचा मतदार व उमेदवार म्हणून सहभाग, खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका, कुठलेही प्रलोभन विरहित निवडणूका, त्या संदर्भातील विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेली प्रतिज्ञा, विद्यार्थ्यांचे नेमण्यात आलेले निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी, नमुना मतपत्रिका, मतदानाची वेळ, केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी, मतदान कक्ष, मतपत्रिका, रबरी फुलीचा शिक्का, मतमोजणी अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी या सर्व बाबी प्रत्यक्ष पद्धतीने राबवून त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश गवले यांनी, तर आभार प्रा. जेजुरकर यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...