आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:तिगाव येथे 3000 झाडांसाठी 101 पाणी टँकरची मदत; झाडं लावण्यापेक्षा जगवणे व वाढवणे महत्त्वाचे : डॉ. गोडगे

पिंपरणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माणूस जन्माला आल्यावर आईच्या दुधापेक्षा त्याला ऑक्सिजनची गरज जास्त असते. त्यासाठी प्रत्येकाने झाडे लावणे गरजेचे आहे. फळांची झाडे लावा मुलांना फळे खाऊ द्या. आज बाजारात फळ सर्व औषध मारलेले आहेत. ती फळे खाऊ घालून आपणच आपल्या मुलांना विष देतो आहे. त्यात आता बदल केला पाहिजे.

यासाठी आपण स्वतःहून सुरुवात करा याची प्रचिती डॉ. गोडगे दाम्पत्याने समाजाला करून दिली वाढदिवसाच्या औचित्य साधून वृक्ष संवर्धनासाठी संगमनेर तालुक्यातील तिगाव ग्रामपंचायतीच्या ३००० झाडांसाठी १०१ पाण्याचे टॅंकरची मदत तळेगाव दिघे येथील दे.ना. गोडगे प्रतिष्ठान च्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ नंदकुमार गोडगे मदत केली.

मान्सूनचा पाऊस लांबल्याने तिगाव ग्रामपंचायतींना झाडे जगवण्याची अडचणी येत होती. ही अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतीला पाण्यासाठी मदत म्हणून ११० टँकर देऊ केले; प्राथमिक स्वरूपात ५१ हजार रुपयाचा चेक दिला. त्याप्रसंगी बोलताना प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार गोडगे म्हणाले, झाडं लावण्यापेक्षा झाडे जगवणे व वाढवणं फार महत्त्वाचा आहे, पावसाळ्यामध्ये आपण भरपूर झाडे लावतो. परंतु उन्हाळ्यामध्ये ते झाडं नष्ट होतात. म्हणून झाडांचे जतन व संवर्धन केले तरच ग्लोबल वार्मिंग विरोधात आपण लढाई जिंकून, जागतिक तापमान वाढ जर अशीच राहिली तर मानवी जीवन धोक्यात येईल, प्रत्येकाने झाडे लावली जगवावी तरच माणूस जगेल. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. अविनाश गोडगे डॉ. नंदकुमार गोडगे, अनिता गोडगे, राजवीर नंदकुमार गोडगे, सरपंच डी. के. सानप, उपसरपंच प्रकाश सानप, मच्छिंद्र सानप, देवराम तुपसुंदर नंदराम शिंदे, नितीन दिघे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...