आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशू संवर्धन:सहाय्यक आयुक्त डाॅ.धुमाळ यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

टाकळीभान3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पशू संवर्धन चिकित्सालय अहमदनगरचे सहाय्यक आयुक्त डाॅ. माणिकराव माधवराव धुमाळ हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा टाकळीभान पशू वैद्यकिय दवाखाना व टाकळीभान ग्रामस्थांतर्फे माजी सभापती नानासाहेब पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. डाॅ. धुमाळ म्हणाले, मी सहाय्यक आयुक्त पशू सर्वचिकित्सालय या पदावर कार्यरत होतो. नुकताच सेवानिवृत्त झालो. शासकिय सेवेत ३१ वर्ष काम केले.

या दरम्यान पशूंच्या आजाराच्या अती किचकट केस येत होत्या तरीही या सर्व केस चांगल्या पद्धतीने सोडवून मुक्या प्राण्यांना जीवदान देण्याचे काम केले आहे. जरी शासकिय सेवेतून सेवानिवृत्त झालो असलो तरीही पशूंची सेवा ही करीत राहाणार आहे, तुम्ही कधीही बोलावले तरी मी येईल, अशी ग्वाही डाॅ. धुमाळ यांनी दिली. यावेळी माजी सभापती पवार, भाजपचे नारायण काळे, डाॅ. विकास नवले, डाॅ. नवनाथ पटारे, पशू वैद्यकिय अधिकारी डाॅ. दिलीप कोकणे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवाजीराव धुमाळ, डाॅ. किशोर हुळहुळे, बापूसाहेब नवले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...