आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:सहायक अभियंता अहिरे हिचा दुर्गा तांबे यांचेकडून सन्मान

संगमनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील संजय गांधी नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या संगीता अहिरे यांनी लोकांची धुनी-भांडी करून मुलगी कल्याणी हिला इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले. मोठ्या जिद्दीने व परिश्रमातून कल्याणी एमपीएससीतून सहायक अभियंता पदावर जाऊन पोहचल्याबद्दल माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी तिचा सन्मान केला.

तांबे म्हणाल्या, कष्ट, जिद्द असेल तर माणूस यशस्वी होतो. गरीबीचे कारण हे अपयश झाकण्यासाठी दाखवले जाते. मात्र, कल्याणीने गरिबीवर मात करून मोठ्या जिद्दीने अधिकारी पद मिळवले. हे संगमनेरकर व अमृतवाहिनी संस्थेसाठी भूषणावह आहे. कल्याणीने अमृतवाहिनीतून सिव्हिल अभियंता पदवी घेतली. जिद्दीने शिक्षण पूर्ण करताना उच्च ध्येय ठेवल्याचे ते म्हणाल्या.

अहिरे म्हणाली, महाविद्यालयात शिक्षण घेताना अधिकाऱ्यांचे राहणीमान व त्यांचा रुबाब पाहून मनात क्लास वन अधिकारी होण्याची ध्येय बाळगले. रात्रंदिवस अभ्यास केला. माध्यमिक विद्यालय, प्राथमिक विद्यालय, अमृतवाहिनी कॉलेजच्या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आपल्या यशात आईचा मोलाचा वाटा असल्याचे तिने सांगितले. यशोधन कार्यालयात डॉ. जयश्री थोरात यांनी कल्याणीच्या सत्कार केला.माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात, अमृतवाहिनीच्या विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश. मधुकर वाकचौरे, शैलेश मेहेत्रे आदींनी तिचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...