आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:इंटरनेट केबल चोरांवर कारवाई करण्याची संघटनेची मागणी ; मोठ्या प्रमाणात केबल चोरीला जाण्याचे प्रकार

नगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी विविध कंपनी कडून शहरात बसवण्यात आलेल्या प्रायमरी फ्लॅट बॉक्स व फायबर केबल शहरातून बऱ्याच ठिकाणाहून चोरी होत आहेत. काही इंटरनेट सेवा बंद झाल्यानंतर केलेल्या तपासणीत हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशन येथे सोफियान हुसैन कुरेशी यांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी अशा स्वरूपाच्या घटनांना आळा बसावा, म्हणून आरोपी जेरबंद करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. डावरे गल्ली, बांबू गल्ली, नवी पेठ आदींसह जिल्ह्यातून अनेक ठिकाणी हे इंटरनेट पुरवणारे बॉक्स व केबल चोरीला जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात आहेत. संघटनेला नुकसान होत असल्याने शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांना निवेदन देत योग्य तपास करण्याची व आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...