आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनावर परिणाम:संगतीचा माणसाच्या जीवनावर मोठा‎ परिणाम होतो : योगेश्वरी दरंदले‎

कौठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाच्या जीवनात पंगत चुकली तरी‎ चालेल पंरतु संगत चुकली नाही पाहिजे. संगत‎ चुकली तर आयुष्य संपण्यासाठी वेळ लागणार नाही.‎ तेव्हा जीवन जगत असताना संगत खूप महत्त्वहीन‎ ठरते, असे निरुपण युवा कीर्तनकार योगेश्वरी दरंदले‎ यांनी केले.‎ नेवासे तालुक्यातील कौठा येथील श्री विठ्ठल‎ मंदिरासमोर जगदंबा देवीचे नवरात्र महोत्सव व‎ कीर्तन महोत्सव आयोजित केला होता.

यामध्ये‎ अनेक किर्तनाचे समाजप्रबोधन पर नाम चिंतन झाले.‎ कौठा येथील सुनबाई असलेल्या व कारेगाव येथील‎ श्री उंडे परिवारातील मुलगी योगेश्वरी दरंदले यांनी‎ आपल्या नाम चिंतनात तरुणांना जीवन जगत‎ असताना संगत कोणाशी असावी यावर मार्गदर्शन‎ केले. पंगत चुकली तर एक दिवस उपाशी राहू‎ शकता. परंतू जीवन घडत असताना संगत चुकली‎ तर आयुष्य संपून जाते, म्हणून संगतीला महत्त्व‎ आहे. तरुणांनी चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिले‎ पाहिजे. कारण चांगल्या माणसा शेजारी बसल्यास‎ किंवा राहिल्यास त्याच्या शरीरातून येणाऱ्या चांगल्या‎ लहरी आपल्या शरीरात प्रवेश करतात. चिंतनाने‎ मनुष्य चिंतामुक्त होतो, असेही त्या म्हणाल्या.‎

बातम्या आणखी आहेत...