आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांच्या समस्या:अरणगाव दुमालाचे सरपंच माेहनराव आढाव यांचे आश्वासन

श्रीगोंदे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामसभा हाच खरा ग्रामपंढरीचा उर्जास्रोत आहे. या उक्तीप्रमाणे सर्वांनी गाव हे कुटुंब मानून गाव विकासासाठी सहकार्य करावे आगामी काळात सरपंच आपल्या दारी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून कोणाची काय समस्या आहे ही जागेवर सोडवण्याचा प्रयत्न करणार व त्याचं निरसन केले जाईल, असे आश्वासन अरणगाव दुमालाचे सरपंच माेहनराव आढाव यांनी दिले.अरणगाव दुमाला येथे ग्राम सभेचे आयोजन केले आहे. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच आढाव म्हणाले, सत्ता ही कोणाचीही कायम राहत नसल्याने गट तट बाजूला ठेवून सर्वांना बरोबर घेऊन गावचा विकास करणार आहे. अरणगाव हे आदर्श गाव केल्याशिवाय राहणार नाही. डीच ते तीन तास विविध विकास कामांच्या प्रश्नावरग्रामसभा शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात झाली.

ग्रामसेवक भरत आव्हाड यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन शासकीय योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी ग्रामसभेत योजनांची माहिती, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, जलजीवन योजनेविषयी चर्चा, अनेक रस्ते मुर्मिकरण करणे,पाणीपट्टीत वाढ करणे, रस्ता काँक्रिटीकरण करणे, स्मशानभूमी शुभोभीकरण करणे अनुसुचीत जाती जमाती मुलींना सायकल वाटप करणे , कुपोषन मुक्त ग्रामपंचायत आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

गावचा सर्वांगीण विकास करत असताना शासनाचे काही नियम असतात नियमानुसार ग्रामपंचायतीचा कारभार चालतो सरपंच व सद्स्य मंडळानी विकास कामात मदत करा दिवाळी पर्यंत विकासाची गंगा तथा चांगली सेवा करून गावातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आहे. गावामध्ये जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा मानस सरपंच आढाव यांचा आहे, असे माजी सरपंच राधू आढाव म्हणाले. यावेळी उपसरपंच ज्योती दिवटे, सदस्य सुभाष सातव, अतुल रणदिवे, शोभा काळे, शहनाज शेख ग्रामसेवक भरत आव्हाड, चेअरमन सुभाष कुटे, व्हा.चेअरमन भाऊसाहेब आढाव, कोंडीभाऊ शिंदे पोलिस पाटील रोहिणी आढाव, उद्योजक दत्ताजी दिवटे, लहानू शिंदे, सिताराम कुटे, बाळासाहेब सातव, मिठू लभडे, राम आढाव, दत्तात्रय लभडे, रज्जाक शेख,उमेश पखाले, हिरामण आढाव, विठ्ठल लभडे, गणेश आढाव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...