आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:कायदेशीर बाबी तपासून बारागाव नांदूर स्मशानभूमीत सोयीसुविधा देण्याचे आश्वासन

राहुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या सात दशकापासून आदिवासी स्मशानभूमी म्हणुन अधिकृत नोंद तसेच आवश्यक सुविधा निर्माण करून आदिवासी समाजाची हेळसांड थांबवावी, या मागणीसंदर्भात गुरूवारी बारागाव नांदूर ग्रामपंचायत प्रशासनाने ठराव संमत करून कायदेशीर बाबी तपासून या स्मशानभूमीत सोयीसुविधा देण्याचे लेखी आश्वासन दिले. मुळानगर बाभुळगावचे माजी सरपंच अंकुश बर्डे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी बारागाव नांदूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आदिवासी ग्रामस्थांनी एकञ येवुन ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन सादर केले.

मुळा धरणाच्या उशाला असलेल्या बारागाव नांदूर येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमी जागेवर अधिकृत नोंद तसेच सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बारागाव नांदूर पंचक्रोशीत आदिवासी समाजाची संख्या मोठी आहे. आजपर्यंत शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत अंत्यसंस्कार तसेच दशक्रियाविधी करण्याची वेळ आलेली आहे. अंत्यसंस्कार करताना मयताच्या नातेवाईकाची हेळसांड होणार नाही, अशी मागणी अंकुश बर्डे व आदिवासी समाजातील ग्रामस्थांनी केली.

सप्टेंबर २०२० मध्ये बारागाव नांदूर येथील आदिवाशी समाजाच्या स्मशानभूमी विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.

माञ अडीच वर्षाचा कालावधी उलटत असताना स्मशानभूमी विकास कामे झाली नसल्याने हे आश्वासन हवेत विरले. मागणीचे निवेदन ग्रामविकास अधिकारी गोसावी यांना देण्यात आले. याबाबत गुरूवारी तातडीने ठराव संमत करण्यात आला. यावेळी राजू माळी, सलीम शेख, नजीर शेख, अशोक माळी, हिरामण शिंदे, बाळासाहेब बर्डे, कैलास पवार, बाळासाहेब बर्डे, तब्बू माळी, जब्बार शेख, ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...