आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध:शिर्डीतून धक्कादायक घटना समोर, हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश; 15 तरुणींची सुटका

शिर्डी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डीच्या पावित्र्यात भंग पाडणारी एक बातमी समोर आली आहे. साईबाबांच्या शिर्डीत अवैध मार्गाने सेक्स रॅकेट चालत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेने सध्या शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे.

साईबाबांच्या भव्य मंदिरामुळे शिर्डी शहर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. याठिकाणी देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. शिर्डीला मिळणाऱ्या सोने-चांदी, हिरे या दानाचीही मोठी चर्चा असते. मात्र साईंच्या या देवाच्या नगरीला धक्का लागणारी घटना याठिकाणी घडली आहे. शिर्डीत हायफाय सेक्स रॅकेट सुरु होते. याबाबत पोलिसांना टीप मिळाली होती.

ग्राहकांचीही तारांबळ उडाली

पोलिसांना शिर्डीमधील काही हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची टिप मिळाली होती. आणि त्यानंतर पोलिसांनी लगेचच शिर्डीतील वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या हॉटेल्सवर छापा टाकला. पोलिसांच्या छाप्यामुळे हॉटेल्सचालकांसोबतच याठिकाणी आलेल्या ग्राहकांचीही तारांबळ उडाली. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्यांना पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतले. यासोबतच काही संशयितानाही पोलिसांनी ताब्यात घेतले. एकेका व्यक्तीचे ओळखपत्र याठिकाणी पोलिसांनी तपासले.

पद्धतशीरपणे सापळा रचला

यावेळी पोलिसांनी 15 पीडित मुलींची सुटका केली आली. तसेच 11 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीरामपूरचे विभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी हा प्रकार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पद्धतशीरपणे सापळा रचला. आणि सेक्स रॅकेट उघड केले.