आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:शिक्षण संचालकांकडून अताएसोची चौकशी सुरू ; अताएसो बचाव कृती समितीच्या आंदोलनाचे यश

अकोले19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाकडून शिक्षण संचालकांनी अताएसो शिक्षक भरतीतील गैरव्यवहार व गैरप्रकाराची चौकशी सुरू केली असून अताएसो बचाव कृती समितीच्या आंदोलनास काही अंशी यश आले आहे. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची चौकशी १६ जूनपासून शिक्षक संचालकांकडून सुरू होणार आहे. यासंदर्भातील सुनावणीस प्रारंभ होणार असून अताएसोत शिक्षक व इतर पदांना जी मान्यता मिळालीय ती नियमानुसार होती किंवा कसे ? याबाबत शिक्षक संचालक चौकशी करणार आहेत. या निर्णयाचे स्वागत अताएसो बचाव कृती समितीचे स्वागत सदस्य काॅम्रेड डॉ. अजित नवले यांनी केले. काॅम्रेड डॉ. नवले म्हणाले, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत अनागोंदी कारभाराबरोबरच भ्रष्टाचार व गैरव्यवहार सुरू आहेत. शिक्षकांच्या नियुक्त्या करताना ४१ लाखापर्यंतच्या बेकायदेशीर रकमा स्वीकारण्यात आल्याचे आरोप संस्थेवर सातत्याने करण्यात येत आहेत. संस्थेच्या मूळ घटनेत अत्यंत लोकशाहीविरोधी बदल करून संस्था एका कुटुंबाच्या मालकीची बनवून एकाधिकारशाही निर्माण केली गेली. भ्रष्टाचारात सामील असलेल्या लोकांना किंवा भ्रष्टाचाराला मूकसंमती असलेल्या लोकांना कार्यकारिणीत स्थान देऊन संस्थेच्या कारभाराला एकाधिकारशाहीचे स्वरूप आले आहे.

बातम्या आणखी आहेत...