आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:आत्मा मालिकचे पी. एम. यशस्वी शिष्यवृत्ती योजनेत 37  विद्यार्थी पात्र

कोपरगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने आयोजित पंतप्रधान पी. एम. यशस्वी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण या विद्यालयाचे ३७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय टेस्टींग एजन्सी मार्फत ‘यशस्वी’ शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले होते. सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्याचा मान आत्मा मालिकने मिळवला आहे.

गुणवत्ता यादीत येणाया इ. ९ वी च्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ७५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दोन वर्षासाठी मिळते. आत्मा मालिकच्या ३७ विद्यार्थ्यांना दोन वर्षात ५५ लाख ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवण्याचा बहुमान पटकावला आहे.

अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन, अनुभवी प्रशिक्षित शिक्षक नियमित सराव यामुळे एवढे मोठे यश प्राप्त झाल्याचे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांना फांऊडेशनचे प्रमुख सचिन डांगे, अथर्व फांऊडेशनचे संचालक नंदकुमार भाटे, डॉ. राहुल मिश्रा, क्षितीज मिश्रा, शिवम तिवारी, वर्गशिक्षक राजेंद्र जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. नंदकुमार सुर्यवंशी, हनुमंत भोंगळे, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, सुधाकर मलिक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...