आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:पारनेर येथे पारधी वस्तीवर हल्ला; बालकाचा मृत्यू, चोरीच्या संशयावरून जमाव संतप्त, 10 जखमी

पाटोदा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोरीच्या संशयाने पाटोदा तालुक्यातील पारनेर येथील पारधी वस्तीवर गावातील काही लोकांनी हल्ला केला. यात एक वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर आठ ते दहा जण जखमी झाले. शनिवारी मध्यरात्री हा थरार घडला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पारध्यांची घरेही पेटवून देण्यात आली. याप्रकरणी १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल झाला. काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भिवराबाई अभिमान काळे (६५, रा. पारनेर) यांनी पाटोदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. शनिवारी मध्यरात्री बाराच्या दरम्यान गावातील बबन औटे, बाळू औटे, कचरू औटे व त्यांची तीन मुले विनोद औटे, अशोक दहिवळे, विष्णू औटे, युवराज औटे व इतर १० ते १२ जणांनी आमच्या घरात येऊन तुझा पोरगा अरुण याने आमच्या माणसाला चाकू मारला, असे म्हणत काठी व लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्याचप्रमाणे जातिवाचक शिवीगाळ करून धमक्या दिल्या. पत्र्याचे शेड जाळून टाकले.

या मारहाणीत भिवराबाई यांचा एक वर्षीय नातू मानू ऊर्फ सिद्धांत अरुण काळे (१) याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर शबाना अरुण काळे, विधी भोसले, अभिमान काळे, देवराबाई काळे, वनिता भोसले, करिना चव्हाण, तारामती काळे, सोजरबाई भोसले यांच्यासह अन्य आठ ते दहा जण जखमी झाले. जखमींना उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आष्टी उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे येथे तळ ठोकून होते. पाटोदा ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष पाटील, सहायक पोलिस निरीक्षक धरणीधर कोळेकर, पोलिस उपनिरीक्षक ए. टी. पठाण, सहायक फौजदार बी. एन. कनके, सुनील सोनवणे, बाळू सानप व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली.

बातम्या आणखी आहेत...