आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:गौराई यात्रेनंतर युवकावर हल्ला ; 17 जणांवर गुन्हा

नगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौराई यात्रेच्या वेळेस रस्त्याच्या कारणातून झालेल्या वादाच्या कारणातून जमावाने चौघावर हल्ला करून जखमी केले. शेंडी (ता. नगर) गावात रविवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी गणेश गोरख ससाणे (वय ३२ रा. शेंडी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून १७ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करण देठे, सागर गावाजी देठे, सागर दिनकर देठे, बाळासाहेब देठे, जीवन वाकडे, नंदू वाकडे, आकाश गायकवाड, अक्षय गायकवाड, जय बागूल, बबलू जाधव, सोन्या दिनकर देठे, विशाल देठे, सुरेश भाऊराव देठे, ऋषिकेश देठे, बाळू सॅलमन देठे, दिनकर देठे, सुभाष गायकवाड (सर्व रा. शेंडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.गणेश ससाणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, शेंडी गावात गौराई यात्रेच्या दिवशी बाळू देठे याच्याशी वाद झाले होते. परंतु, तेव्हा आपसात वाद मिटवले होते. रविवारी रात्री साडेआठ वाजता अमोल नेटके, नितीन नेटके यांच्यासह गावात थांबलो होतो. त्याच वेळी घरासमोर आरडा-ओरड झाली. बेबी नेटके आणि आकाश जाधव यांना मारहाण झाली होती. आपण घराकडे निघालो असता जमावातील करण देठे यांनी सत्तुरने आकाश जाधव व आपणावर वार केला. दरम्यान, या गुन्ह्यातील १२ जणांना अटक केलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...