आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील नाऊर येथील गोदावरी पात्रांमध्ये असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या सुमारे २२ फळ्या चोरून नेणाऱ्या चोरट्यांना जागृत नागरिकांनी सुमारे १० ते ११ किमीपर्यंत पाठलाग करून हे वाहन अडवले. व चोरट्यांना चोप देत पोलिसांच्या हवाली केले. नाऊर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या फळ्या रात्री १ ते २ च्या सुमारास चोरट्यांनी चोरून घेऊन जात असता काही सतर्क नागरिकांनी पाहिले. चोरट्यांच्या ताब्यात असलेले वाहन एमएच १२ -एक्यू-७११२ थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटयांनी वाहन वेगाने घेऊन पळवल्याने ग्रामस्थांना शंका आली. या गाडीचा मोटरसायकल वरून पाठलाग करून उंदिरगाव भागात असलेल्या काही नागरिकांना या घटनेची कल्पना दिली. सुमारे १० ते ११ किमी पाठलाग करत संबधित वाहन पकडून चोरट्याना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, यापूर्वी देखील तीन वेळेस येथील बंधाऱ्यांच्या लोखंडी फळ्याची चोरी झाली असुन आरोपीना देखील अटक करण्यात आली होती. सातत्याने याच बंधाऱ्याच्या फळ्या चोरी जात आहेत. या बंधाऱ्या लगत पूर्वी असलेली इमारत पुन्हा बांधली तर बऱ्याच अंशी चोऱ्या थांबण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली.
श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशन मध्ये शासकिय लोखंडी प्लेटांची चोरी केली म्हणून कैलास भागवतराव बोर्डे यांच्या फिर्यादीवरून आरोपी इलिहास मेहमूद शेख वय २४ रा. बिफ मार्केट जवळ वार्ड नं.२. श्रीरामपूर, महेश सुनील साठे (२४ हरेगाव), आनंदा बाळू साळवे ( वय ३३ एकवाडी हरेगाव) यांना अटक केली. त्यांच्या बरोबरचे इतर ३ साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.