आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:दारुच्या नशेत पत्नीवर वार करुन खुनाचा प्रयत्न; आरोपीस सहा जूनपर्यंत पोलिस कोठडी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दारूच्या नशेत पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी पहाटे ही घटना घडली. जखमी पत्नीच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पतीला अटक करण्यात आली असून सहा जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

निलेश फुलारे (मूळ रा.श्रीरामपूर, हल्ली रा. श्रीरामचौक) असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याची पत्नी पूजा हिने फिर्याद दिली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास निलेश हा दारु पिऊन घरी आला. दारुच्या नशेत पत्नीला शिवीगाळ केली. तुम्ही मला शिवीगाळ का करता, असे पत्नीने विचारल्याचा राग आल्याने पती निलेश याने घरातील भाजीपाला कापण्याचा चाकू घेवून तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने वार केले. तुला आज मारुन टाकतो, अशी धमकी देवून वार केला व तेथून निघून गेला. जखमी पूजा हिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी पती निलेश याला अटक केली असून, न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.

बातम्या आणखी आहेत...