आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:कोयत्याने हल्ला करत एकाच्या खुनाचा प्रयत्न; गुन्हा दाखल

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्याकडे काय पाहतोस, असे म्हणत दोघांनी एकावर कोयत्याने हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना भिंगार शहरातील पंचशील कमानीजवळ घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुण उर्फ बाबू राजन भुलैया (रा. सौरभ नगर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे.

सनी शंकर निकाळजे व अभिलेख धर्मेंद्र वाघेला (दोघे रा.गौतमनगर, भिंगार) अशी आरोपींची नावे आहेत. २ जून रोजी ही घटना घडली आहे. सोमवारी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी भुलैया यांना आमच्याकडे काय पाहतोस, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करत जखमी केले. दोघांनी पकडून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...