आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:टोळक्याकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न; तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोळक्याने युवकावर तलवार, कोयता, चॉपर व लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हाशिर एजाज शेख (वय २३, रा. शनिगल्ली, झेंडीगेट, अहमदनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने पोलिसांना दिलेल्या जाबाबावरून ११ ते १२ जणांविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारूफ रियाज शेख (रा. पंचपीर चावडी), शहेबाज शौकत कुरेशी, अल्तमाझ ऊर्फ अल्लु शौकत कुरेशी, मिजान बरकत कुरेशी, इम्तीयाज कुरेशी, आनीस बाबा (सर्व रा. शनि गल्ली, झेंडीगेट), काझीम शेख, बब्बु (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. ईदगाह मैदान) व इतर तीन ते चार अनोळखी यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजता कराचीनगर जाणाऱ्या रोडवरील हुंडेकरी पार्किंगजवळ ही घटना घडली.

हाशिर व त्यांचे चुलते मारूफ यांच्यामध्ये सुमारे तीन वर्षांपासून घराचे जागेवरून वाद आहेत. ३ जून रोजी हाशिर यांच्या वडिलांचा व मारूफ यांचा एका वलिमा कार्यक्रमात वाद झाला होता. सोमवारी (दि.६) रात्री साडेदहा वाजता हाशिर रामवाडी, सर्जेपुरा येथील कृष्णा अपार्टमेंट येथे पुलटेबल गेम खेळत असताना ११ ते १२ जण तेथे आले व ते हाशिर याला म्हणाले, ‘वलिमा कार्यक्रमात जो वाद झाला आहे, तो आपण आपसात मिटून टाकू, तू माझ्यासोबत गाडीवर चल, असे म्हणाल्याने हाशिर याला त्यांनी कराचीनगर रोडवर हुंडेकरी पार्किंगजवळ घेऊन गेले. तेथे असलेल्या १० ते ११ जणांनी मारूफच्या सांगण्यावरून हाशिरला तलवार, कोयता, चॉपर, लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...