आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्वाही:विरोधकांकडून व्यक्तिगत त्रास देण्याचा प्रयत्न ; मात्र विकासाकामांसाठी कटिबद्ध

सोनई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे तालुक्यात स्व. मारुतराव घुले व माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी विचारांचे व तत्त्वाचे राजकारण केले. परंतु आता तालुक्यातील विरोधकांनी राजकरण खालच्या पातळीवर चालवले आहे. वेळोवेळी मला व्यक्तिगत त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कितीही त्रास झाला तरी मी विकासासाठी आपल्या सर्वांच्या साथीने कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार शंकरराव गडाख यांनी दिली.

नेवासे तालुक्यातील पिंप्री शहाली येथे आमदार गडाख यांच्या प्रयत्नातून मंजूर पिंप्री शहाली ते सुकळी रस्ता डांबरीकरण करणे, पिंप्री शहाली ते गोयगव्हाण वाकडी रस्ता खडीकरण करणे, बंदिस्त व्यायामशाळा साहित्य यांचे लोकार्पण व पिंप्री शहाली येथील २ जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे व गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे यांचे भूमिपूजन सोमवारी झाले, त्याप्रसंगी आमदार गडाख बोलत होते. अध्यक्षस्थानी दत्तात्रय नवथर हे होते.

आमदार गडाख म्हणाले, पिंप्री शहाली व परिसरातील टेलच्या गावांना मुळाचे पाणी मिळत नाही व मिळाले तरी उशीर होतो त्यामुळे मुळाचे पाणी व्यवस्थित व वेळेवर मिळावे ही आपली खूप दिवसांपासूनची मागणी होती त्यामुळे प्रयत्नपूर्वक मुळा उजवा कालवा दुरुस्तीसाठी ७० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या परिसराला वेळेवर पाणी मिळणार आहे. कडूबाळ कर्डिले,श्रीरंग हारदे,नानासाहेब बाप्पूराव नवथर ,लहू नवथर ,बबन म्हस्के,अमोल गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. पिंप्री शहाली येथे व्यायामशाळेसाठी खोली उपलब्ध करून देणारे ज्ञानदेव गोसावी यांचा आमदार गडाख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी नानासाहेब तुवर चेअरमन मुळा सह साखर कारखाना सोनई, कडूबाळ कर्डिले व्हा चेअरमन मुळा सह साखर कारखाना सोनई,किशोर जोजार उपसभापती, अशोक मंडलिक,अशोक हारदे,श्रीरंग हारदे,कडूबाळ गोरे,कडूबाळ गायकवाड, बाळासाहेब गोरे, बाळासाहेब बनकर,बबनराव दरंदले, दादा निपुंगे, अशोक काळे,व विठ्ठलराव नाबदे,राजेंद्र परसैय्या, माऊली बोरुडे,अजय रिंधे,बाळासाहेब कचरे,हरिभाऊ थोरे,राहुल जावळे, राजेंद्र म्हस्के,अशोक गर्जे,सिद्धार्थ कावरे,भगवान आगळे,शंकरराव खाटीक, गणेश शेटे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...