आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोहेगाव आरोग्य केंद्रातील प्रकार:कोडनंबर लिहिलेली पाटी असलेला फोटो पाठवला तरच लागते हजेरी

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना दररोज एक कोड पाठवला जातो. हा कोड पाटीवर अथवा कागदावर लिहून ती पाटी हातात धरून काढलेला फोटो पाठवल्यानंतरच त्या कर्मचाऱ्यांची हजेरी लावली जाते, असा अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. बायोमेट्रिक प्रणाली अस्तित्वात असतानाही, आरोग्य यंत्रणेने केलेला हा प्रयोग वादग्रस्त ठरला आहे.

जिल्ह्यासह राज्यभरात शासकीय कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली आहे. परंतु, कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव आरोग्य केंद्रात हजेरीसाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. याप्रकाराकडे कास्ट्राईब संघटनेचे चंद्रकांत वाकचाैरे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. कर्मचाऱ्यांचा एक व्हाॅटस्अप गृप तयार केला आहे. त्यावर दररोज साडेआठच्या सुमारास एक कोड पाठवला जातो. हा कोड पाटीवर अथवा कागदावर लिहून हातात धरलेला फोटो या गृपवर पाठवावा लागतो, अशी माहिती समोर आली. हा फोटो पाठवल्यानंतरच कर्मचाऱ्यांची हजेरी लागते.

ही पद्धत थांबवली
फिल्डवर असताना पूर्वी हजेरी हा प्रकार नव्हता त्यामुळे कर्मचारी हजर आहेत किंवा नाही ते कळत नव्हते. बायोमेट्रिकलाही त्रुटी येतात. त्यामुळे आम्ही सकाळी साडेआठच्या सुमारास गृपवर कोड टाकत होतो. त्यानंतर कागदावर अथवा पाटीवर हा कोड लिहून फोटो पाठवला जात होता. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, सध्या ही पद्धत थांबवण्यात आली आहे.''-नितीन बडदे, वैद्यकीय अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...