आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रेचा शुभारंभ:हरेगाव मतमाऊली यात्रेत सहा लाखांवर भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील हरिगाव संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे ७४ वा मतमाउली यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून सुमारे सहा लाख भाविकांनी हजेरी लावली आहे.शनिवारी सकाळी हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ यांच्या हस्ते व संजय पंडित, विलास सोनवणे आदी धर्मगुरू यांचे उपस्थितीत सकाळी मतमाउलीच्या शिरावर चांदीचा मुकुट चढवून पुष्पहार अर्पण करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

सकाळपासून हरिगाव फाटा ते चर्चपर्यंत पदयात्रेने येणाऱ्या भाविकांची गर्दी उसळली होती. दुपारी ४ वाजता नाशिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लूरडस डानियल यांनी पवित्र मरीयेच्या जन्माचा उद्देश, ध्येय या विषयवार सविस्तर मातेचा महिमा व जीवन यावर प्रवचन केले.

त्यावेळी स्थानिक धर्मगुरू समवेत परिसरातील सर्व धर्मगुरू उपस्थित होते. यावेळी आमदार लहू कानडे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, सिद्धार्थ मुरकुटे, काँग्रेस नेते हेमंत ओगले, बाबासाहेब दिघे, राजेंद्र पाउलबुद्धे, रईस जहागीरदार, उद्योजक जितेंद्र तोरणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रांताधिकारी अनिल पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार प्रशांत पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. श्रीरामपूर आगाराने अतिरिक्त बससेवा सुरू ठेवली होती.

बातम्या आणखी आहेत...