आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअतिवृष्टीमुळे खरिप वाया गेल्याने रब्बी हंगामाकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ऊस वगळता 2 लाख 62 हजार 348 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. हे प्रमाण सरासरी पेरणी क्षेत्राच्या ६७.१७ टक्के असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 498.8 मिमी असताना प्रत्यक्षात 745.7 मिमी पाऊस झाला. सरासरीच्या दिडपट झालेल्या पावसामुळे खरिप हंगामातील पिके पाण्यात गेली. कोट्यवधींचा फटका शेतकऱ्यांना या एकाच हंगामात बसला आहे. अशा परिस्थितीत पीक पंचनाम्यानंतर नुकसानीपोटीची मदत मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु अद्याप काहीच पदरात पडले नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे. परतीच्या पावसामुळे नोव्हेंबरपर्यंत अनेक भागातील शेतात पाणी होते. त्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी विलंबानेच सुरू झाली.
जिल्ह्याचे सरासरी रब्बीचे क्षेत्र 4 लाख 58 हजार 635 आहे. त्यातुलनेत आतापर्यंत 67 टक्के पेरणी झाली आहे. त्यात प्रामुख्याने ज्वारीची पेरणी 1 लाख 37 हजार 999 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. तर हरभरा 57 हजार 953, गहू पेरणी 53 हजार 127 हेक्टरवर झाली. त्याखालोखाल मकाची पेरणी 13 हजार 127 हेक्टरवर झाली आहे.
उर्वरीत करडई, जवस, तीळ, सूर्यफूल पिकाची पेरणी किरकोळ क्षेत्रावर झाली. नवीन ऊसाची लागवड 63 हजार 601 हेक्टरवर झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या एकूण 67 टक्के पेरणीपैकी ज्वारीची पेरणी 51 टक्के, गहू 61 टक्के, मका 92 टक्के, हरभरा 65 टक्के तर जवस अपेक्षीत क्षेत्रावर 100 टक्के पेरणी झाल्याची कृषी विभागाकडे नोंद झाली आहे. यंदा उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या पावसामुळे धरणे शंभर टक्के भरली, तसेच गावतळी व इतर सखल भागात अजूनही पाणी आहे. त्याचा फायदा विहिर बागायत क्षेत्राला होऊन, रब्बीत अधिक उत्पादनाची आशा आहे.
पेरणीची आकडेवारी (हेक्टर)
तृणधान्य -204334
कडधान्य -57959
गळीतधान्य -54
ऊस (लागवड) - 63601
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.